Read in తెలుగు / ಕನ್ನಡ / தமிழ் / देवनागरी / English (IAST)
काकड आरती
– १. जोडूनियां कर –
जोडूनियां कर चरणीं ठेविला माथा ।
परिसावी विनंती माझी पंढरीनाथा ॥ १ ॥
असो नसो भाव आलों तुझिया ठाया ।
कृपादृष्टीं पाहें मजकडे सद्गुरुराया ॥ २ ॥
अखंडित असावें ऐसे वाटतें पायीं ।
सांडूनी संकोच ठाव थोडासा देयी ॥ ३ ॥
तुकाम्हणे देवा माझी वेडीवांकुडी ।
नामें भवपाश हातीं आपुल्या तोडी ॥ ४ ॥
– २. उठा पांडुरंगा –
उठा पांडुरंगा प्रभातसमयो पातला ।
वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला ॥ १ ॥
गरूडपारापासुनी महाद्वारापर्यंत ।
सुरवरांची मांदी उभी जोडूनिया हात ॥ २ ॥
शुकसनकादिक नारदतुंबुर भक्तांच्या कोटी ।
त्रिशूल डमरू घेउनि उभा गिरिजेचा पती ॥ ३ ॥
कलीयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी ।
पाठीमागें उभी डोला लावुनियां जनी ॥ ४ ॥
– ३. उठा उठा श्री सायिनाथ गुरु –
उठा उठा श्रीसायिनाथ गुरु चरणकमल दावा ।
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ॥
गेली तुम्हां सोडुनियां भवतमरजनी विलया
परि ही अज्ञानासी तुमची भुलवि योगमाया ।
शक्ति न अम्हां यत्किंचितही तिजला साराया
तुम्हीच तीतें सारुनि दावा मुख जन ताराया ॥ १ ॥
भो सायिनाथ महाराज भवतिमिरनाशक रवी
अज्ञानी आम्ही किती तव वर्णावी थोरवी ।
ती वर्णितां भागले बहुवदनि शेष विधि कवी
सकृप होउनि महिमा तुमचा तुम्हीच वदवावा ॥ २ ॥
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ।
उठा उठा श्रीसायिनाथ गुरु चरण कमलदावा ।
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ॥
भक्त मनीं सद्भाव धरूनि जे तुम्हां अनुसरले
ध्यायास्तव ते दर्शन तुमचें द्वारिं उभे ठेले ।
ध्यानस्था तुम्हांस पाहुनी मन अमुचें धाले
परि त्वद्वचनामृत प्राशायातें आतुर झाले ॥ ३ ॥
उघडूनी नेत्रकमाला दीनबंधु रमाकांता ।
पाहिं बा कृपादृष्टीं बालका जशी माता ।
रंजवी मधुरवाणी हरीं ताप सायिनाथ ॥ ४ ॥
आम्हीच अपुले काजास्तव तुज कष्टवितो देवा ।
सहन करीशी एकुनी द्यावी भेट कृष्ण धावां ॥ ५ ॥
उठा उठा श्री सायिनाथ गुरु चरणकमल दावा ।
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ॥ ६ ॥
– ४. दर्शन द्या –
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां ।
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥ १ ॥
संत साधू मुनी अवघे झालेती गोळा ।
सोडा शेजे सुखे आतां बघुं द्या मुखकमळा ॥ २ ॥
रंगमंडपी महाद्वारीं झालीसे दाटी ।
मन उतावीळ रूप पहावया दृष्टी ॥ ३ ॥
राही रखुमाबाई तुम्हां येऊं द्या दया ।
शेजे हालवूनी जागें करा देवराया ॥ ४ ॥
गरूड हनुमंत उभे पाहती वाट ।
स्वर्गींचे सुरवर घेउनि आले बोभाट ॥ ५ ॥
झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।
विष्णुदास नामा उभा घेउनि कांकडा ॥ ६ ॥
– ५. पंचारती –
घेउनियां पंचारती ।
करूं बाबांसी आरती ॥ १ ॥
उठा उठा हो बांधव ।
ओंवाळूं हा रमाधवा ॥ २ ॥
करूनिया स्थिर मन ।
पाहूं गंभीर हें ध्यान ॥ ३ ॥
कृष्णनाथा दत्तसायी ।
जडो चित्त तुझे पायी ॥ ४ ॥
– ६. चिन्मयरूप –
कांकड आरति करीतों सायीनाथ देवा ।
चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक लघुसेवा ॥
काम क्रोध मद मत्सर आटुनी कांकडा केला ।
वैराग्याचे तूप घालुनि मी तो भिजविला ।
सायीनाथ गुरुभक्ति ज्वलनें तो मी पेटविला ।
तद्वृत्ती जाळूनी गुरुनें प्रकाश पाडीला ।
द्वैततमा नासूनी मिळवी तत्स्वरूपीं जीवा ।
चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक लघुसेवा ॥ १ ॥
कांकड आरति करीतों सायीनाथ देवा ।
चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक लघुसेवा ॥
भूखेचर व्यापूनी अवघे हृत्कमलीं राहसी ।
तोचि दत्तदेव शिरडी राहुनी पावसी ।
राहूनी येथे अन्यत्रहि तू भक्तांस्तव धावसी ।
निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसी ।
न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा ।
चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक लघुसेवा ॥ २ ॥
कांकड आरति करीतों सायीनाथ देवा ।
चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक लघुसेवा ॥
त्वद्यशदुंदुभीने सारे अंबर हें कोंदलें ।
सगुण मूर्ति पाहण्या आतुर जन शिरडी आले ।
प्राशुनी त्वद्वचनामृत अमुचे देहभान हरपलें ।
सोडूनियां दुरभिमान मानस त्वच्चरणीं वाहिले ।
कृपा करूनियां सायिमाउले दास पदरी घ्यावा ।
चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक लघुसेवा ॥ ३ ॥
कांकड आरति करीतों सायीनाथ देवा ।
चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक लघुसेवा ॥
– ७. पंडरीनाथा –
भक्तिचिया पोटीं बोध कांकडा ज्योती ।
पंचप्राण जीवेंभावे ओवाळूं आरती ॥
ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा । (माझ्या सायीनाथा)
दोन्ही कर जोडोनी चरणीं ठेविला माथा ॥ १ ॥
काय महिमा वर्णू आतां सांगणे किती ।
कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥ २ ॥
रायी रखुमाबायी उभ्या दोघी दो बाहीं ।
मयूरपिच्छ चामरें ढाळिति ठायीं ठायी ॥ ३ ॥
तुका म्हणे दीप घेउनि उन्मनीत शोभा ।
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥
ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा । (माझ्या सायीनाथा)
दोन्ही कर जोडोनी चरणीं ठेविला माथा ॥ ४ ॥
– ८. उठा उठा (पद) –
उठा साधुसंत साधा आपुलालें हित ।
जाईल जाईल हा नरदेह मग कैंचा भगवंत ॥ १ ॥
उठोनियां पहाटें बाबा उभा असे विटे ।
चरण तयांचे गोमटे अमृतदृष्टी अवलोका ॥ २ ॥
उठा उठा हो वेगेंसीं चला जाउंया राउळासी ।
जळतील पातकांच्या राशी कांकड आरती देखिलिया ॥ ३ ॥
जागें करा रुक्मिणीवर देव आहे निजसुरांत ।
वेगें लिंबलोण करा दृष्ट होईल तयासी ॥ ४ ॥
दारीं वाजंत्री वाजती ढोल दमामे गर्जती ।
होतसें कांकड आरती माझ्या सद्गुरु रायांची ॥ ५ ॥
सिंहनाद शंखभेरी आनंद होतसें महाद्वारी ।
केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो ॥ ६ ॥
– भजन –
सायिनाथ गुरु माझे आई ।
मजला ठाव द्यावा पायीं ॥
दत्तराज गुरु माझे आई ।
मजला ठाव द्यावा पायीं ॥
श्रीसच्चिदानंद सद्गुरु सायिनाथ महाराज की जै ।
– ९. श्री सायिनाथ प्रभाताष्टक –
(पृथ्वी)
प्रभातसमयीं नभा शुभ रविप्रभा पांकली
स्मरे गुरु सदा अशा समयिं त्या छळे ना कली ।
म्हणोनि कर जोडूनी करूं आता गुरुप्रार्थना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ १ ॥
तमा निरसि भानु हा गुरुहि नासि अज्ञानता
परंतु गुरुची करी न रविही कधीं साम्यता ।
पुन्हां तिमिर जन्म घे गुरुकृपेनि अज्ञान ना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ २ ॥
रवि प्रगट होउनि त्वरित घालवी आलसा
तसा गुरुहि सोडवी सकल दुष्कृतीलालसा ।
हरोनी अभिमानही जडवि त्वत्पदीं भावना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ ३ ॥
गुरुसि उपमा दिसे विधिहरीहरांची उणी
कुठोनि मग येई ती कवनीं या उगी पाहुणी ।
तुझीच उपमा तुला बरवि शोभते सज्जना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ ४ ॥
समाधि उतरोनियां गुरु चला मशिदीकडे
त्वदीय वचनोक्ति ती मधुर वारिती सांकडें ।
अजातरिपु सद्गुरु अखिलपातका भंजना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ ५ ॥
अहा सुसमयासि या गुरु उठोनियां बैसले
विलोकुनि पदाश्रिता त्वदिय आपदे नासिलें ।
असा सुहितकारि या जगतिं कोणिही अन्य ना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ ६ ॥
असे बहुत शाहणा परि न ज्या गुरुचि कृपा
न तत्स्वहित त्या कळे करितसे रिकाम्या गपा ।
जरी गुरुपदा धरी सुधृड भक्तिनें तो मना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ ७ ॥
गुरो विनंति मी करीं हृदयमंदिरीं या बसा
समस्त जग हें गुरुस्वरूपची ठसो मानसा ।
घडो सतत सत्कृती मतिहि दे जगत्पावना
समर्थ गुरु सायिनाथ पुरवी मनोवासना ॥ ८ ॥
(स्रग्धारा)
प्रेमें या अष्टकासी पढुनि गुरुवरा प्रार्थिती जे प्रभातीं
त्यांचे चित्तासि देतों अखिल हरूनियां भ्रांति मी नित्य शांति ।
ऐसें हें सायिनाथें कथुनि सुचविलें जेवि या बालकासी
तेंवी त्या कृष्णपायी नमुनि सविनयें अर्पितों अष्टकासी ॥ ९ ॥
श्रीसच्चिदानंद सद्गुरु सायिनाथ महाराज की जै ।
– १०. सायि रहम् नजर् करना –
सायि रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ।
सायि रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ॥
जाना तुमने जगत्पसारा सब् हि झूठ् जमाना ।
जाना तुमने जगत्पसारा सब् हि झूठ् जमाना ।
सायी रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ।
सायी रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ॥ १ ॥
मैं अंधा हूं बंदा आप् का मुझ् को चरण दिखलाना ।
मैं अंधा हूं बंदा आप् का मुझ् को प्रभु दिखलाना ।
सायी रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ।
सायी रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ॥ २ ॥
दास गनू कहे अब् क्या बोलूं थक् गयि मेरी रसना ।
दास गनू कहे अब् क्या बोलूं थक् गयि मेरी रसना ।
सायी रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ।
सायी रहम् नजर् करना बच्चोंका पालन् करना ॥ ३ ॥
– ११. रहम् नजर् करो –
रहम् नजर् करो अब् मोरे सायीं
तुम बिन नहीं मुझे मां बाप् भायी ॥
रहम् नजर् करो ॥
मैं अंधा हूं बंदा तुम्हारा ।
मैं अंधा हूं बंदा तुम्हारा ।
मैं ना जानूं मै ना जानूं
मैं ना जानुं अल्ला इलाही ॥ १
रहम् नजर् करो ॥
खाली जमाना मैंने गमाया ।
खाली जमाना मैंने गमाया ।
साथी आखिरी (का) साथी आखिरी (का)
साथी आखिरी तू और् न कोयी ॥ २
रहम् नजर् करो ॥
अप्ने मसीद् का झाडू गनू है ।
अप्ने मसीद् का झाडू गनू है ।
मालिक् हमारे मालिक् हमारे
मालिक् हमारे तुम् बाबा सायी ॥ ३
रहम् नजर् करो ॥
– १२. जनि पद –
तुज काय देऊं सावळ्या मी खाया तरी ।
मी दुबळी बटिक नाम्याची जाण श्रीहरी ॥
उच्छिष्ट तुला देणें ही गोष्ट ना बरी ।
तूं जगन्नाथ तुज देऊं कशी रे भाकरी ॥
नको अंत मदीय पाहूं सख्या भगवंता । श्रीकांता ।
मध्याह्नरात्र उलटोनि गेली हि आतां । आण चित्ता ॥
जा होईल तुझा रे कांकडा कीं राउळांतरीं ।
आणतील भक्त नैवेद्यहि नानापरी ॥
तुज काय देऊं सावळ्या मी खाया तरी ।
मी दुबळी बटिक नाम्याची जाण श्रीहरी ॥
– १३. श्रीसद्गुरु पद –
श्रीसद्गुरु बाबा सायी
तुजवांचुनि आश्रय नाहीं भूतली ॥
मी पापी पतित धीमंदा ।
तारणें मला गुरुनाथा झढकरी ॥ १ ॥
तूं शांतिक्षमेचा मेरू ।
तूं भवार्णवींचें तारूं गुरुवरा ॥ २ ॥
गुरुवरा मजसि पामरा,
अतां उद्धरा,
त्वरित लवलाही,
मी बुडतो भवभय डोही उद्धरा ॥ ३
श्रीसद्गुरु बाबा सायी
तुजवांचुनि आश्रय नाहीं भूतली ॥
श्रीसच्चिदानंद सद्गुरु सायिनाथ महाराज की जै ।
राजाधिराज योगिराज परब्रह्म सायिनाथ महराज् की जै ।
इतर श्री शिर्डी साईबाबा स्तोत्राणि पश्यतु ।
గమనిక : మా తదుపరి ప్రచురణ "శ్రీ దక్షిణామూర్తి స్తోత్రనిధి" పుస్తకము ప్రింటు చేయుటకు ఆలోచన చేయుచున్నాము.
పైరసీ ప్రకటన : శ్రీఆదిపూడి వెంకటశివసాయిరామ్ గారు మరియు నాగేంద్రాస్ న్యూ గొల్లపూడి వీరాస్వామి సన్ కలిసి స్తోత్రనిధి పుస్తకాలను ఉన్నది ఉన్నట్టు కాపీచేసి, పేరు మార్చి అమ్ముతున్నారు. దయచేసి గమనించగలరు.
Chant other stotras in తెలుగు, ಕನ್ನಡ, தமிழ், देवनागरी, english.
Did you see any mistake/variation in the content above? Click here to report mistakes and corrections in Stotranidhi content.