Read in తెలుగు / ಕನ್ನಡ / தமிழ் / देवनागरी / English (IAST)
— प्रथम —
शांत हो श्रीगुरुदत्ता ।
मम चित्ता शमवी आता ॥
तू केवळ माता जनिता ।
सर्वथा तू हितकर्ता ॥
तू आप्त स्वजन भ्राता ।
सर्वथा तूंचि त्राता ॥
भयकर्ता तू भयहर्ता ।
दंडधर्ता तू परिपाता ॥
तुज वाचुनि न दुजी वार्ता ।
तू आर्ता आश्रय दत्ता ॥ १ ॥
शांत हो श्रीगुरुदत्ता ।
मम चित्ता शमवी आता ॥
अपराधास्तव गुरुनाथा ।
जरि दंडा धरिसी यथार्था ॥
तरि आम्ही गाउनि गाथा ।
तव चरणी नमवूं माथा ॥
तू तथापि दंडिसी देवा ।
कोणाचा मग करूं धावा ॥
सोडविता दुसरा तेव्हां ।
कोण दत्ता आम्हां त्राता ॥ २ ॥
शांत हो श्रीगुरुदत्ता ।
मम चित्ता शमवी आता ॥
तू नटसा होउनि कोपी ।
दंडिताहि आम्ही पापी ॥
पुनरपिही चुकत तथापि ।
आम्हांवरि न च संतापी ॥
गच्छतः स्खलनं क्वापि ।
असें मानुनि नच हो कोपी ॥
निजकृपा लेशा ओपी ।
आम्हांवरि तू भगवंता ॥ ३ ॥
शांत हो श्रीगुरुदत्ता ।
मम चित्ता शमवी आता ॥
तव पदरीं असता ताता ।
आडमार्गी पाऊल पडतां ॥
सांभाळुनि मार्गावरता ।
आणिता न दूजा त्राता ॥
निजबिरुदा आणुनि चित्ता ।
तू पतितपावन दत्ता ॥
वळे आतां आम्हांवरता ।
करुणाघन तू गुरुनाथा ॥ ४ ॥
शांत हो श्रीगुरुदत्ता ।
मम चित्ता शमवी आता ॥
सहकुटुंब सहपरिवार ।
दास आम्ही हे घरदार ॥
तव पदी अर्पु असार ।
संसाराहित हा भार ॥
परिहरिसी करुणासिंधो ।
तू दीनादयाळ सुबंधो ॥
आम्हा अघ लेश न बाधो ।
वासुदेव प्रार्थित दत्ता ॥ ५ ॥
शांत हो श्रीगुरुदत्ता ।
मम चित्ता शमवी आता ॥
— द्वितीय —
श्रीगुरुदत्ता जय भगवंता ।
ते मन निष्ठुर न करी आता ॥
चोरें द्विजासी मारीता मन जे ।
कळवळलें ते कळवळो आता ॥ १ ॥
श्रीगुरुदत्ता जय भगवंता ।
ते मन निष्ठुर न करी आता ॥
पोटशुळाने द्विज तडफडता ।
कळवळलें ते कळवळो आता ॥ २ ॥
श्रीगुरुदत्ता जय भगवंता ।
ते मन निष्ठुर न करी आता ॥
द्विजसुत मरता वळले ते मन ।
हो की उदासीन न वळे आता ॥ ३ ॥
श्रीगुरुदत्ता जय भगवंता ।
ते मन निष्ठुर न करी आता ॥
सतिपति मरता काकुळती येता ।
वळले ते मन न वळे की आता ॥ ४ ॥
श्रीगुरुदत्ता जय भगवंता ।
ते मन निष्ठुर न करी आता ॥
श्रीगुरुदत्ता त्यजि निष्ठुरता ।
कोमल चित्ता वळवी आता ॥ ५ ॥
श्रीगुरुदत्ता जय भगवंता ।
ते मन निष्ठुर न करी आता ॥
— तृतीय —
जय करुणाघन निजजनजीवन ।
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥
निज अपराधे उफराटी दृष्टी ।
होऊनि पोटी भय धरू पावन ॥ १ ॥
जय करुणाघन निजजनजीवन ।
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥
तू करुणाकर कधी आम्हावर ।
रुसशी न किंकर वरद कृपाघन ॥ २ ॥
जय करुणाघन निजजनजीवन ।
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥
वारी अपराध तू मायबाप ।
तव मनी कोप लेश न वामन ॥ ३ ॥
जय करुणाघन निजजनजीवन ।
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥
बालक अपराधा गणे जरी माता ।
तरी कोण त्राता देईल जीवन ॥ ४ ॥
जय करुणाघन निजजनजीवन ।
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥
प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव ।
पदी देवो ठाव देव अत्रिनंदन ॥ ५ ॥
जय करुणाघन निजजनजीवन ।
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥
इतर श्री दत्तात्रेय स्तोत्राणि पश्यतु |
గమనిక : హనుమద్విజయోత్సవం (హనుమజ్జయంతి) సందర్భంగా "శ్రీ ఆంజనేయ స్తోత్రనిధి" పుస్తకము కొనుగోలుకు అందుబాటులో ఉంది. Click here to buy.
పైరసీ ప్రకటన : శ్రీఆదిపూడి వెంకటశివసాయిరామ్ గారు మరియు నాగేంద్రాస్ న్యూ గొల్లపూడి వీరాస్వామి సన్ కలిసి మా పుస్తకాలను ఉన్నది ఉన్నట్టు కాపీచేసి, పేరు మార్చి అమ్ముతున్నారు. దయచేసి గమనించగలరు.
Chant other stotras in తెలుగు, ಕನ್ನಡ, தமிழ், देवनागरी, english.
Did you see any mistake/variation in the content above? Click here to report mistakes and corrections in Stotranidhi content.