Read in తెలుగు / ಕನ್ನಡ / தமிழ் / देवनागरी / English (IAST)
– १. पाचाही तत्त्वांची आरती –
ओवाळूँ आरती माझ्या सद्गुरुनाथा माझा सायिनाथा ।
पाचाही तत्त्वांचा दीप लाविला आताँ ॥
निर्गुणाची स्थिती कैसी आकारा आली । बाबा आकारा आली ।
सर्वाँ घटीँ भरूनि उरली सायी माऊली ॥
ओवाळूँ आरती माझ्या सद्गुरुनाथा माझा सायिनाथा ।
पाचाही तत्त्वांचा दीप लाविला आताँ ॥ १ ॥
रज तम सत्व तिघे माया प्रसवली । बाबा माया प्रसवली ।
मायेचिये पोटीँ कैसी माया उद्भवली ॥
ओवाळूँ आरती माझ्या सद्गुरुनाथा माझा सायिनाथा ।
पाचाही तत्त्वांचा दीप लाविला आताँ ॥ २ ॥
सप्तसागरीँ कैसा खेळ मांडिला । बाबा खेळ मांडिला ।
खेळूनीया खेळ अवघा विस्तार केळा ॥
ओवाळूँ आरती माझ्या सद्गुरुनाथा माझा सायिनाथा ।
पाचाही तत्त्वांचा दीप लाविला आताँ ॥ ४ ॥
ब्रह्मांडीची रचना कैसी दाखविली डोलाँ । बाबा दाखविली डोलाँ ।
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ॥
ओवाळूँ आरती माझ्या सद्गुरुनाथा माझा सायिनाथा ।
पाचाही तत्त्वांचा दीप लाविला आताँ ॥ ४ ॥
– २. आरती ज्ञानरायाची –
आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ।
आरती ज्ञानराजा ॥
लोपलेँ ज्ञान जगीँ । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नाम ठेविलेँ ज्ञानी ॥ १ ॥
आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ।
आरती ज्ञानराजा ॥
कनकाचे ताट करीँ । उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरहो । सामगायन करी ॥ २ ॥
आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ।
आरती ज्ञानराजा ॥
प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्मचि केले ।
रामजनार्दनीँ । पायी मस्तक ठेविलेँ ॥ ३ ॥
आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ।
आरती ज्ञानराजा ॥
– ३. आरती तुकारामाची –
आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ।
सच्चिदानंदमूर्ती । पाय दाखवीँ आम्हाँ ॥
आरती तुकारामा ॥
राघवेँ सागराँता । (जैसे) पाषाण तारीलेँ ।
तैसे (हे) तुकोबाचे । अभंग (उदकी) रक्षिलेँ ॥ १ ॥
आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ।
सच्चिदानंदमूर्ती । पाय दाखवीँ आम्हाँ ॥
आरती तुकारामा ॥
तुकिता तुलनेसी । ब्रह्म तुकासी आलेँ ।
म्हणोनी रामेश्वरेँ । चरणीँ मस्तक ठेविलेँ ॥ २ ॥
आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ।
सच्चिदानंदमूर्ती । पाय दाखवीँ आम्हाँ ॥
आरती तुकारामा ॥
– ४. जय जय सायीनाथ –
जय जय सायिनाथ आताँ पहुडावेँ मंदिरीँ हो । ( * २ *)
आळवितो सप्रेमेँ तुजला आरति घेउनि करीँ हो ।
जय जय सायिनाथ आताँ पहुडावेँ मंदिरीँ हो ॥
रंजविसी तू मधुर बोलुनी माय जशी निज मुला हो । ( * २ * )
भोगिसि व्याधी तूँच हरूनिया निजसेवकदुःखाला हो । ( * २ * )
धाँवुनि भक्तव्यसन हरिसी दर्शन देसी त्याला हो । ( * २ * )
झाले असतील कष्ट अतिशय तुमचे या देहाला हो ॥ १ ॥
जय जय सायिनाथ आताँ पहुडावेँ मंदिरीँ हो ।
आळवितो सप्रेमेँ तुजला आरति घेउनि करीँ हो ।
जय जय सायिनाथ आताँ पहुडावेँ मंदिरीँ हो ॥
क्षमा शयन सुंदर ही शोभा सुमनशेज त्यावरी हो । ( * २ * )
घ्यावी थोडी भक्तजनांची पूजनादि चाकरी हो । ( * २ * )
ओवाळितोँ पंचप्राण ज्योति सुमती करीँ हो । ( * २ * )
सेवा किंकर भक्त प्रीती अत्तर परिमळ वारी हो ॥ २ ॥
जय जय सायिनाथ आताँ पहुडावेँ मंदिरीँ हो ।
आळवितो सप्रेमेँ तुजला आरति घेउनि करीँ हो ।
जय जय सायिनाथ आताँ पहुडावेँ मंदिरीँ हो ॥
सोडुनि जाया दुःख वाटतेँ बाबांचा चरणाँसी हो ।
सोडुनि जाया दुःख वाटतेँ सयींचा चरणाँसी हो ।
आज्ञेस्तव हा आशीर्प्रसाद घेउनि निजसदनासी हो । ( * २ * )
जातोँ आताँ येउँ पुनरपि त्वच्चरणांचे पाशीँ हो । ( * २ * )
उठवू तुजला सायिमाउले निजहित साधायासी हो ॥ ३ ॥
जय जय सायिनाथ आताँ पहुडावेँ मंदिरीँ हो ।
आळवितो सप्रेमेँ तुजला आरति घेउनि करीँ हो ।
जय जय सायिनाथ आताँ पहुडावेँ मंदिरीँ हो ॥
– ५. आताँ स्वामी –
आताँ स्वामी सुखेँ निद्रा करा अवधूता ।
बाबा करा सायिनाथा ।
चिन्मय हेँ सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥
वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला ।
बाबा चौक झाडीला ।
तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥
आताँ स्वामी सुखेँ निद्रा करा अवधूता ।
बाबा करा सायिनाथा ।
चिन्मय हेँ सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ १ ॥
पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ति ।
बाबा नवविधा भक्ती ।
ज्ञानांच्या समया लावुनि उजलळ्या ज्योती ॥
आताँ स्वामी सुखेँ निद्रा करा अवधूता ।
बाबा करा सायिनाथा ।
चिन्मय हेँ सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ २ ॥
भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगिला ।
हृदयाकाशीँ टांगिला ।
मनाची सुमने करूनि केलेँ शेजेला ॥
आताँ स्वामी सुखेँ निद्रा करा अवधूता ।
बाबा करा सायिनाथा ।
चिन्मय हेँ सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ ३ ॥
द्वैताँचे कपाट लावुनि एकत्र केलेँ ।
बाबा एकत्र केलेँ ।
दुर्बुद्धीच्या गाँठी सोडूनि पडदे सोडिले ॥
आताँ स्वामी सुखेँ निद्रा करा अवधूता ।
बाबा करा सायिनाथा ।
चिन्मय हेँ सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ ४ ॥
आशा तृष्णा कल्पनेचा साँडुनि गलबला ।
बाबा साँडुनि गलबला ।
दया क्षमा शांति दासी उभ्या सेवेला ॥
आताँ स्वामी सुखेँ निद्रा करा अवधूता ।
बाबा करा सायिनाथा ।
चिन्मय हेँ सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ ५ ॥
अलक्ष्य उन्मनी घेउनी (बाबा) नाजुक दुशाला ।
बाबा नाजुक दुशाला ।
निरंजन सद्गुरु स्वामी निजे शेजेला ॥ (भेदः-निजविल)
आताँ स्वामी सुखेँ निद्रा करा अवधूता ।
बाबा करा सायिनाथा ।
चिन्मय हेँ सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ ६ ॥
सद्गुरु सायिनाथ् महराज् की जै ॥
श्रीगुरुदेव दत्त ॥
– ६. प्रसाद मिळण्याकरितां –
पाहेँ प्रसादाची वाट । द्यावेँ धुवोनिँया ताट ।
शेष घेउनी जायीन । तुमचेँ झालिया भोजन ॥ १ ॥
झालोँ एकसवा । तुम्हा आळवोनीया देवा ।
शेष घेउनी जायीन । तुमचेँ झालिया भोजन ॥ २ ॥
तुका म्हणे चित्ता । करूनि राहिलो निवांत ।
शेष घेउनी जायीन । तुमचेँ झालिया भोजन ॥ ३ ॥
– ७. प्रसाद मिळाल्यावर –
पावला प्रसाद आताँ विठोँ निजावेँ ।
बाबा आता निजावे ।
आपुला तो श्रम कळोँ येतसे भावेँ ॥
आताँ स्वामी सुखेँ निद्रा करा गोपाळा ।
बाबा सायी दयाळा ।
पुरले मनोरथ जातो आपुले स्थळा ॥ १ ॥
तुम्हाँसी जागवूँ आम्ही आपुल्या चाडा ।
बाबा आपुल्या चाडा ।
शुभाशुभ कर्मे दोष हरावया पीडा ॥
आताँ स्वामी सुखेँ निद्रा करा गोपाळा ।
बाबा सायी दयाळा ।
पुरले मनोरथ जातो अपुले स्थळा ॥ २ ॥
तुका म्हणे दिधिलेँ उच्छिष्टाँचे भोजन ।
उच्छिष्टाँचे भोजन ।
नाहीँ निवडिलेँ आम्हां आपुल्या भिन्न ॥
आताँ स्वामी सुखेँ निद्रा करा गोपाळा ।
बाबा सायी दयाळा ।
पुरले मनोरथ जातो अपुले स्थळा ॥ ३ ॥
सद्गुरु सायीनाथ् महराज् की जै ॥
राजाधिराज योगिराज परब्रह्म सायिनाथ् महाराज्
श्रीसच्चिदानंद सद्गुरु सायिनाथ् महराज् की जै ॥
పైరసీ ప్రకటన : నాగేంద్రాస్ న్యూ గొల్లపూడి వీరాస్వామి సన్ మరియు శ్రీఆదిపూడి వెంకటశివసాయిరామ్ గారు కలిసి మా రెండు పుస్తకాలను ("శ్రీ వారాహీ స్తోత్రనిధి" మరియు "శ్రీ శ్యామలా స్తోత్రనిధి") ఉన్నది ఉన్నట్టు కాపీచేసి, పేరు మార్చి అమ్ముతున్నారు. దయచేసి గమనించగలరు.
Chant other stotras in తెలుగు, ಕನ್ನಡ, தமிழ், देवनागरी, english.
Did you see any mistake/variation in the content above? Click here to report mistakes and corrections in Stotranidhi content.